BREAKING! जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखला बेड्या

अहिल्यानगर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते.

वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभेत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केले होते.

या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. या प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून देशमुख हे फरार होते. कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. देशमुखला लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच….

Leave a Comment