कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी वसंत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
पण वसंत देशमुख यांना आज जामीन मिळाला. संगमनेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. रविवारी पुण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुख यांना अटक केली होती. जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं त्यांना चांगलेच महागात पडले.
संगमनेरचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी सांगितले की, वसंत देशमुख यांची तब्येत बिघडल्यानंतर आणि बायपास झालेले असल्याने त्यांची संगमनेर येथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिकच्या रुग्णालयात रेफर केले आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आले.’
