राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार(Ajit pawar) आज बारामती(Baramati) दौऱ्यावर असताना पत्रकाराच्या एका प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.
पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा तुम्ही दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची रेष असते आणि पत्रकाराच्या याच प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी ए बाबा असं काही नसतं! म्हणत,
उद्या मी म्हणालो की तू बारामतीचा आमदार हो ही काळ्या दगडावरची रेष खरी होणार आहे का? असा उलट प्रश्न विचारत दादांनी पवार शैलीत उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
