आणे घाटातून नगरचे दोन मोटारसायकल चोर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाने धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद करत २,४३,०००/- रू किंमतीच्या एकुण ०८ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. मागील महिनाभरात मोटारसायकल चोरीबाबत ही तीसरी मोठी कारवाई करण्यात आली असुन आतापर्यत एकुण १५,९३,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ४७ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन तीन टोळया जेरबंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण जिल्हयातील मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या घटनेची बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिलेवरून दि. ०१ एप्रिल रोजी जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, पोना संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, चापोकॉ दगडु विरकर या पथकाने गोपनीय माहितीचे आधारे संदिप पोपट केदार, वय २१ वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर व राजु गंगाराम दुधवडे, वय २० वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांना आणे घाट परीसरातुन ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई करत पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हातील मोटार सायकलचे एकुण ०४ गुन्हे उघडकिस आणले असुन २,४३,००० /- रूपये किंमतीच्या एकुण ८ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेले संशयीत इसम नामे संदिप पोपट केदार, वय २१ वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर व राजु गंगाराम दुधवडे, वय २० वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांना नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तपासकामी जमा करण्यात आले असुन इतर दोन आरोपी यापुर्वी स्थागुशा पथकाने अटक केले आहेत. सदर आरोपींकडुन नारायणगाव पोस्टे – १, जुन्नर पो स्टे – १, श्रीगोंदा पो स्टे – १ व पारनेर पो. स्टे -१ असे एकुण चार मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग, जुन्नर उपविभागिय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, राजू मोमीण, पोना संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, चापोकॉ दगडु विरकर, यांनी केली आहे.

Leave a Comment