नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला महाराष्ट्रभरात सुरूवात झाली आहेत, त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने अज्ञात औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
नांदेडच्या किनवटमध्ये हा प्रकार घडला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघातून गोविंद जेठेवार हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. गोविंद जेठेवार यांनी अज्ञात औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
गोविंद जेठेवार यांनी आर्थिक व्यवहारातून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. जेठेवार यांच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
