महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरेंनी घेतली दोन नेत्यांची नावे 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मोठं विधान केलं होतं. माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असं अजिबात नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच्या दोन नेत्यांची नावं घेत त्यांना थेट पाठिंबाच दर्शवला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘शरद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखी कुणाचं नाव असेल तर त्यांनी जाहीर करावं. काँग्रेसने जाहीर करावं, मी जाहीर करेन. मला हे महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत. त्यांनी माझ्या पाठीत वार केला, याचा मला राग आहे. याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचंच आहे असा नाही’, असं उद्धव ठाकरे मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Comment