सावधान! राज्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा 

सध्या देशभरात हिवाळा सुरु झाला आहे. हळूहळू थंडी वाढत चालली आहे. महाराष्ट्रात देखील थंडी पडताना दिसत आहे. सध्या पावसाळी वातावरण निवळले असून उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. राज्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे.

सध्या महाराष्ट्रात थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले आहे. आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत अंदाज वर्तवला आहे.

सध्या कोमेरिन भार आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरु झाला आहे. उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. तर दिल्लीला निचांकी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे.

कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मुंबईतील सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे.

 

राज्यातील तापमान

पुणे ३१.२, अहिल्यानगर ३१, धुळे (११),जळगाव ३२.८,कोल्हापूर ३०.३, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३१.३, निफाड ३०.४, सांगली ३१.९, सातारा ३०.७, सोलापूर ३४.४, सांतक्रुझ ३५.८, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३५.८, छत्रपती संभाजी नगर ३१,८.

Leave a Comment