महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं. कधीही काहीही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतील. आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही. एकनाथ शिंदेसाहेब योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य. ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.
