मोठी बातमी!…..तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत आहेत. मात्र, खरे चित्र 23 तारखेच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

मात्र एक्झिट पोलचे निकाल पाहता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर यावेळी मुख्यमंत्री कोण होणार, असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, “आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना 100 टक्के वाटते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. राष्ट्रवादीला अजितदादा हवे आहेत आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) हेच हवे आहे. केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील तिन्ही नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांबाबत आपली प्रतिक्रिया दिली. नागपूरहून मुंबईला रवाना होत असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही तिघेही एकत्र बसू.”

ते पुढे म्हणाले, “पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना असल्या तरी त्यावर आता काहीही बोलणार नाही. निकाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ.”

Leave a Comment