मुंबई : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अर्ध्याहून अधिक दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआय बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 17 बँक सुट्ट्या असतील.
RBI प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करते. डिसेंबर महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्यात देशातील बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील. डिसेंबरमधील 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो. पुढील महिन्यात 5 रविवार येणार आहेत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना 6 दिवसांऐवजी 7 दिवसांची साप्ताहिक रजा मिळणार आहे.
नाताळ सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे डिसेंबर महिन्यात बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. या 17 दिवसांच्या सुट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी होणार नाहीत. RBI ने डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्टयांची यादी जाहीर केली आहे. डिसेंबरमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका – डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. तसंच इयर एन्डिंगमुळे 31 आणि 1 जानेवारीला बँकेत तुमचं काम होणार नाही. त्यामुळे तुम्ही नियोजन करताना हे सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहून नियोजन करा.
बँक जरी बंद राहणार असल्या तरी नेटबँकिंग सुरू असणार आहे. काहीवेळा UPI पेमेंटचा सर्व्हर डाउन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या सुट्ट्यानुसार तुम्ही थोडे पैसे हातात काढून ठेवायला हवेत. शिवाय छोटी कामं तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंगच्या सहाय्याने करू शकता.
१ डिसेंबरला (रविवार) बंद राहणार आहेत.
३ डिसेंबरला (मंगळवार) बँका बंद राहणार आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या सणानिमित्त गोव्यात बँक बंद
8 डिसेंबर (रविवार) देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
12 डिसेंबर (मंगळवार) मेघालयमध्ये पा-तोगन नेंगमिंजा संगमा निमित्त बँका बंद राहतील.
14 डिसेंबर (शनिवार) दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
15 डिसेंबर (रविवार) देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
18 डिसेंबर (बुधवार) मेघालयमध्ये यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद राहतील.
१९ डिसेंबरला (गुरुवार) गोव्यात गोवा मुक्ती दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
22 डिसेंबरला रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
24 डिसेंबर (गुरुवार) मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील.
25 डिसेंबर (बुधवार) ख्रिसमसच्या निमित्ताने संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
26 डिसेंबर (गुरुवार) मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
27 डिसेंबर (शुक्रवार) नागालँडमध्ये नाताळच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
28 डिसेंबर (शनिवार) चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
29 डिसेंबर (रविवार) देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
30 डिसेंबर (सोमवार) मेघालयमध्ये U Kiang Nangbah निमित्त बँका बंद राहतील.
31 डिसेंबर (मंगळवार) मिझोराम आणि सिक्कीममध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला/लोसॉन्ग/नामसाँगच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
