ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे. त्यामुळं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत.
नियमानुसार पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते त्यासाठी शुल्क भरावा लागतो. ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचे म्हणणं आहे. मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांनी सांगितले आहे.
