बिग ब्रेकिंग! पराभवानंतर राज्यातील “या” दिग्गज नेत्याची राजकारणातून निवृत्ती 

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला आहे. त्यानंतर आडम मास्तर यांनी हा निर्णय घेतला आहे.

नरसय्या आडम हे आयुष्यभर सामाजिक चळवळीत काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यापुढे केवळ पक्षाचा म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आडम मास्तर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून यावेळी महाविकास आघाडी आडम मास्तरांना संधी देईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने येथून चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडम यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र कोठे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आडम मास्तरांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment