पुण्यासह ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी 

राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागानं राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे.

30 ते 40 किमी ताशी वेगानं वारे वाहतील, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात तापमान कोरडं, ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment