नगर हादरले! काँग्रेसच्या “या” नेत्याचा मृतदेह आढळला भयानक अवस्थेत 

काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह शनिवारी (दि. 7) सकाळी शेवगाव रस्त्यालगत असलेल्या खेर्डा फाटा येथील शेतात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. शेख हे तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या राजकारणाची सुरवात माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली.

दि. 25 नोव्हेंबरला त्यांच्या नातेवाइकांनी ते बेपत्ता झाल्याची खबर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. शनिवारी त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथे आढळून आल्याचे समजताच अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभयसिंग लबडे, पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे, इजाज सय्यद, संजय जाधव दाखल झाले.

त्यांनी शेख यांच्या कुटुंबीयांना बोलावून घेत त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी शेवगाव रस्त्यावरील काही दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून व पायातील चपलावरून हा शेख यांचा मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यांचे काही अवशेष डीएनए तपासणीसाठी नाशिकला पाठवले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment