मेष : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्चिक : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मकर : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द वाढेल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
