नगर ब्रेकिंग! दुचाकी एसटी बसचा भीषण अपघात, युवक ठार

राहुरी – राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याजवळ सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात युवराज भुजाडी हा तरूण ठार झाल्याची घटना घडली. जोगेश्वरी आखाडा येथील युवराज कैलास भुजाडी (वय 21) हा सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी नगर एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. तो दररोज त्याच्या दुचाकीवर ये-जा करत असे.

सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान युवराज भुजाडी हा नेहमी प्रमाणे त्याच्या दुचाकीवर नगर एमआडीसी येथे कामाला जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याजवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणार्‍या एसटी बसची जोराची धडक बसली.

या धडकेत युवराज भुजाडी हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय आधिकार्‍यांनी घोषित केले. याचे शवविच्छेदन केल्यानंतर काल दुपारी 3 वाजता जोगेश्वरी आखाडा येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Leave a Comment