शेतकऱ्यांसाठी खुशखबर…PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार, मोठी अपडेट समोर…

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आहेत. आता 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

पीएम किसान योजनेमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. सरकारने ऑक्टोबर महिन्यात 18 वा हप्ता जमा केला होता. त्या हिशोबाने ऑक्टोबरनंतर फेब्रुवारीमध्ये 19 वा हप्ता देण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते

Leave a Comment