BREAKING….विराट कोहली’वर मोठी कारवाई 

IND vs AUS: मेलबर्नवर रंगलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहली(Virat Kohli)आणि सॅम कोन्सटान्स यांच्यात तुफान राडा झाला होता. या राड्यात दोन्ही खेळाडूंमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दीक वाद झाला होता.

या वादानंतर आयसीसी अॅक्शन मोडवर आली असून तिने विराट कोहलीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि 19 वर्षीय खेळाडू सॅम कोन्सटान्स यांच्यात वाद झाला होता.या वादानंतर आयसीसी अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याला सॅमला धक्का दिल्याप्रकरणी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. जर विराटला जर 4 डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याच्यावर एक मॅचची बंदी घेतली गेली असती.

नियम काय आहे? 

क्रिकेट हा शारीरीक संपर्काचा खेळ नाही आणि शारीरीक संपर्काबाबत अनेक नियम आहेत. ICC च्या आचारसंहिता (CoC) मधील नियमांत याचा उल्लेख आहे. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचा 2.12चा नियम सांगतो की, “क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा अयोग्य शारीरिक संपर्क निषिद्ध आहे. मर्यादेशिवाय, खेळाडूंनी मुद्दाम, बेपर्वाईने आणि/किंवा निष्काळजीपणे दुसऱ्या खेळाडू किंवा अंपायरशी धाव घेतल्यास किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावल्यास ते या नियमाचे उल्लंघन ठरतो.

“भंगाच्या गांभीर्याचे मूल्यांकन करताना, खालील घटक (मर्यादेशिवाय) विचारात घेतले जातील: (i) विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ, यासह, मर्यादेशिवाय, संपर्क जाणूनबुजून (म्हणजे हेतुपुरस्सर), बेपर्वा, निष्काळजीपणाचा होता का. , आणि/किंवा टाळता येण्याजोगा; कोणाशी संपर्क साधला होता.”

 

नेमका वाद काय झाला?

खरं तर भारताच्या 10 व्या ओव्हर दरम्यान हा सगळा राडा खडला आहे.कदाचित सॅम कोन्सटास क्रिझ क्रॉस करत होता. त्याच्या समोरून विराट कोहली जात होता.यावेळेस विराटचा खांदा अचानक थेट सॅम कोन्सटास धडकला. त्यानंतर सॅम कोन्सटास भडकला आणि त्याने विराटच्या दिशेने पाहून काहीतरी पुटपुटायला सूरूवात केली. यावेळी विराट देखील त्याला काहीतरी बोलला. दोघांमधीली शाब्दीक वाद वाढताना पाहून उस्मान ख्वाजा आणि अंपायरने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटला. या वादाचा आता व्हिडिओ आता व्हायरल होत आहे

Leave a Comment