पुण्यात थंडीचा जोर कमी झाला असून शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये पुणेकरांना रेनकोट सोबत ठेवावा लागणार आहे, पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची (Pune Rain Update) शक्यता आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची (Pune Rain Update) शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
तर गेल्या चोवीस तासांमध्ये शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली आहे. पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी देखील हवेत गारवा जाणवत आहे.(Pune Rain Update)
शहरात पहाटेच्या सुमारास धुके पडत आहेत, तर दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण जाणवते. शहरातील कमाल व किमान तापमान काही प्रमाणात चढ उतार झाल्यामुळे सकाळी थंडी दुपारी काहीसा उकाडा जाणवत होता. आज (शुक्रवारी ता. 27) पुणे शहर, जिल्हा आणि घाट परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Pune Rain Update) पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवले आहे.
