… म्हणून मनमोहन सिंग यांची भाषणं उर्दूत लिहिली जायची, काय होतं कारण?

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सगळीकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे सल्लागार संजय बारू यांनी त्यांची आठवण सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

त्याविषयी सांगितलं की मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांची भाषण ही गुरुमुखीमध्ये किंवा मग उर्दूमध्ये लिहिण्यात येत होती.

संजय बारू यांनी त्यांच्या 2014 मध्ये ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या प्रकाशित केलं होतं. त्या पुस्तकात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते म्हणाले होचे की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांची सगळी भाषणं ही उर्दूमध्ये लिहिण्यात यायची.

त्याविषयी सांगत त्यांनी पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करत लिहिलं की ते हिंदीमध्ये बोलू शकत होते, पण कधी देवनागरी लिपी किंवा हिंदी भाषेत बोलायला शिकले नाही. तर दुसरीकडे ते स्पष्टपणे उर्दू वाचू शकत होते. हेच एकमेव कारण आहे की मनमोहन सिंग हे इंग्रजीमध्ये भाषण द्यायचे. त्यांना त्यांचं पहिलं भाषण देण्यासाठई तीन दिवस प्रॅक्टिस करावी लागली.

Leave a Comment