Mukesh Ambani : मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; जगात ‘या’ स्थानावर…

जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

प्रतिष्ठीत संस्था फोर्ब्जने मंगळवारी (दि.४) ३७ वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती ही ८३.४ बिलीयन डॉलर आहे. यापूर्वीही अंबानी आशियतील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत.

सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये ९ व्या क्रमांकावर आहेत. काही महिन्यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचया यादीत तिसऱ्या स्थानी असलेले अदानी आता २४ व्या स्थानावर आहेत.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंतांची यादी पाहता मुकेश अंबानी यांची क्रमवारी वाढली आहे हे लक्षात येईल. यापूर्वी १० व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी २०२३ मध्ये ९ व्या स्थानी आहेत. पण यावेळी त्यांच्या क्रमवारीत वाढ झाली असली तरी त्यांच्या संपत्तीत मात्र घट झाली आहे.

गेल्यावेळी ते १० व्या स्थानी होते तेव्हा त्यांची संपत्ती ९०.७ बिलीयन डॉलर होती. तर २०२३ मध्ये ते जगातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानी आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि संपत्ती ८३.४ बिलियन डॉलर आहे. मुकेश अंबानी यांनी फेसबुकची मालकी असलेले मार्क झुकेरबर्ग, गुगलचे सर्गेई ब्रिन आणि ड्वेलचे मायकल डेल यांना मागे टाकले आहे.

Leave a Comment