भयानक! गोड बोलून बहिणीला डोंगरावर नेलं अन्…

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीला 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून तिची हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच तिला ढकलून तिचा जीव घेतला. मृत मुलीचे नाव नम्रता गणेश शेरकर आहे, जी 17 वर्षांची होती. तसेच, तिच्या सख्या चुलत भावाचे नाव ऋषिकेश तानाजी शेरकर आहे, जो 25 वर्षांचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

 

जीवाला धोका असल्याची केली होती तक्रार

अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून गेली होती, आणि त्यानंतर तिने शहागड पोलिसांत जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. घरच्यांनी समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश तिला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला आणि तिथेच त्याने तिला ढकलून दिले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.

पुढील तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. आसपासच्या लोकांनीही घटनास्थळी येऊन मदत केली. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment