घरगुती गॅस पुरवठ्याबाबत मोठा निर्णय, “या” कुटुंबाला सिलेंडर मिळणार नाही

एलपीजी आणि पीएनजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यांच्याकडे घरगुती गॅसचे ‘डबल कनेक्शन’ आहे, त्यांच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे.

एलपीजी गॅस सिलिंडर आणि गॅस पाईपलाईन अशा दोन्ही सुविधा वापरणाऱ्यांसाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. त्याशिवाय, ई-केवायसी (e-KYC) करणे आता अनिवार्य झाले आहे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर नवीन कनेक्शन घेणाऱ्यांवर आणि सिलिंडर बुकिंग करणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) पुरवठ्याबाबत शनिवारी महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीच पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत. पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल. सरकारकडून शनिवारी यासंदर्भातील अधिकृत नियमावली जारी करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीत नेमके बदल कोणते?

सरकारकडून गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी ईकेवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबांनी अजून आपली बायोमेट्रिक ओळख (ई-केवायसी) अपडेट केलेली नाही, त्यांना नवीन गॅस कनेक्शन घेताना अडचणी येतील. आधार कार्ड लिंक नसेल अथवा पत्त्यात तफावत असेल तर नवीन सिलेंडर मिळणे कठीण होईल.

अन्यथा बुकिंग बंद –

एलपीजीच्या जुन्या ग्राहकांना ठराविक मुदतीत केवायसी अपडेट करावीच लागेल. अन्यथा त्यांचे गॅस सिलेंडर बुकिंग थांबवले जाऊ शकते.गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय एकाच्याच नावावर अनेक गॅस कनेक्शन असतात, त्यावरही या निर्णायामुळे चाप बसणार आहे.

सरकारनं नेमका काय निर्णय घेतला ?

आता एकाच घरात पीएनजी (PNG-पाईप गॅस) आणि एलपीजी (LPG सिलेंडर) दोन्ही कनेक्शन ठेवणे बेकायदेशीर ठरेल.

ज्यांच्याकडे सक्रिय पीएनजी कनेक्शन आहे, ते यापुढे त्यांचे जुने एलपीजी सिलेंडर पुन्हा बुक करू शकत नाहीत.

ज्यांच्याकडे दोन्ही सुविधा आहेत त्यांना त्यांचे घरगुती एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल.

पाईप गॅस (PNG) ग्राहकांना आता नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करता येणार नाही.

Leave a Comment