संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर शिवारातील बोराटे वस्ती येथे एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वार – रविवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
पाराजी धोंडीबा देवगिरे (वय ५०) रा. साकूर देवगिरे वस्ती, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र या घटनेन साकूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकूर शिवारातील देवगिरे वस्ती येथे पाराजी धोंडीबा देवगिरे हे वास्तव्यात आहे. तसेच त्यांची जवळच बोराटे वस्ती येथे शेतजमीन आहे. या शेतजमीनीमध्ये शेतीसाठी नव्यानेच शेततळे उभारले आहे. दरम्यान रविवार दि. १५ मार्च रोजी सकाळी काही कामानिमित्त पाराजी देवगिरे शेततळ्यावर गेले होते. यावेळी शेततळ्यात त्यांचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र बराच वेळ झाला पण पाराजी घरी का आले नाही यासाठी घरच्यांनी आजूबाजूला चौकशी केली.
शेवटी शेततळ्यावर जाऊन बघितले असता त्यांचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला. त्यांना तातडीने साकूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाराजी देवगिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
पारजी देवगिरे हे संजय देवगिरे यांचे बंधू आहे. पाराजी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे साकूरवर शोककळा पसरली आहे.
