मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याची चौकशी करण्यात येत आहे. वाल्मीक कराड याच्या आईने पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केलेय. माझ्या मुलाला न्याय द्या… असे म्हणत वाल्मीक कराड याच्या आईने आंदोलन केलेय. वाल्मीक कराड याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, राजकारणामुळे मुलावर अन्याय होत असल्याचे वाल्मीक कराडच्या आईने सांगितले.
माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा, त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत, असे वाल्मीक कराड यांच्या आईने बोलताना सांगितले आहे. सुरेश धस,संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचे देखील उपस्थित महिला सांगत आहेत.
आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड याच्यासाठी त्याची आईने ठिय्या आंदोलन केलेय. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे.वाल्मीक कराड याची पोलीस कोठडी आज संपत आहे, त्याला केज कोर्टासमोर आज हजर करणयात येणार आहे.
दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड यांनी सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे.
