भूमिपुत्रच्या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद, पारनेरमध्ये घडणार मोठी क्रांती 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी विडा उचलला आहे. तसेच हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे कृती समिती अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट होताना दिसत आहे. बहुतांश गावात कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच शहांजापूर व पळवे बुद्रुक येथे देखील कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकजूट होताना दिसत असल्याने आगामी काळात पारनेर तालुक्यात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावेळी संतोष वाडेकर, संतोष वाबळे, बाळशिराम पायमोडे, मोहन रोकडे, सुभाष पाटील करंजुले, राहुल गुंड, गोरख पठारे, रघुनाथ मांडगे, प्रमोद गवळी, अण्णा मोटे, देविदास मोटे, साहेबराव म्हस्के, उत्तम बेंद्रे, किसन म्हस्के, बापु म्हस्के, सबाजी जरे, बाबा म्हस्के, बाळू म्हस्के, रामदास मोटे, प्रमोद सोनवणे, बाबा म्हस्के, चेअरमन किसन कळमकर, ग्रा.सदस्य संपत पळसकर, संतोष मोरे, विठ्ठल कळमकर, राजू जाधव, विजू कळमकर, बाळासाहेब पळसकर, योगीराज जाधव, तात्याभाऊ पवार,गोरख म्हस्के, देवा मोटे, दत्तू म्हस्के, संजय जरे, वसंत मोटे, दत्तात्रय मोटे, संकेत म्हस्के, बेंद्रे रतन, प्रमोद सकट, जगन्नाथ सकट, गोरख जाधव, अजय म्हस्के, शुभम म्हस्के, संभाजी पावडे, अविनाश म्हस्के, भाऊसाहेब म्हस्के मच्छिंद्र मोटे, यश जरे, गणेश लाड, गणेश म्हस्के, ओंकार म्हस्के, अक्षय जरे, अंकुश म्हस्के, सुषमा म्हस्के, जनाबाई म्हस्के, मोहित जरे, बबन सकट,अजय म्हस्के, रामदास मोटे, एकनाथ गवळी, शरद म्हस्के, विनायक म्हस्के यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Leave a Comment