पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेने ११४ दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी विडा उचलला आहे. तसेच हक्काचे पाणी मिळण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे कृती समिती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट होताना दिसत आहे. बहुतांश गावात कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच जातेगाव व गटेवाडी येथे देखील कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच जोपर्यंत वावरात पाणी येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा एल्गार शेतकऱ्यांनी केलाय. गावोगावी अक्षरशः भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कृती समितीत देखील शेतकरी, ग्रामस्थ स्वखुशीने सहभागी होत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची एकजूट होताना दिसत असल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मोठी ताकद वाढली आहे.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, डॉ. विलास काळे, बाळासाहेब तांबे मेजर, सुभाष करंजुले, मनोज तामखडे, अन्सार पटेल, राहुल गुंड, गोरख पठारे, अरुण बेलकर, प्रवीण खोडदे,विशाल फटांगडे, दिगंबर पोटघन, दत्तात्रय ढोरमले, रघुनाथ मांडगे, गणेश वाखारे, विठ्ठल पोटघन, संजय गायकवाड, गोकुळ पोटघन, सोपान पोटघन, सुभाष ढोरमले, दत्तात्रय ढोरमले, गौरम ढोरमले, संतोष वाखारे, सुरेश पोटघन, माऊली पोटघन, हरिभाऊ फटांगडे ,पांडुरंग पडघन, विलास पोटघन, बाबाजी ढोरमले, विलास ढोरमले, मोहम्मद पठाण, सुखदेव पडघन, शहाजी ढोरमले, संजय ढोरमले, राजू फटांगडे, अनिल ढोरमले,तुकाराम पोटघन, निलेश पोटघण, संदीप गट, किसन पवार, बापूसाहेब गट, बाबा डावकर, किरण गट, संदीप गट, संदीप पवार, राजेंद्र गट, भगवान गट, तुळशीराम पिसे, विलास ठाणगे, राहुल सकट, बाळासाहेब गट, राहुल डावखर, अशोक गट यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
