बिरेवाडीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची बातमी समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. वनविभागाने तत्परतेने बिरेवाडी येथील फडवस्ती परिसरात पिंजरा लावला होता.

मात्र या ठिकाणी अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. आज रात्री हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी बिबट्या बघण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क केला वन कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Comment