मेष : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मिथुन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवाद टाळावेत.
