महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही, तर….

नाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या दाव्याला भाजप नेते दरेकरांनी देखील दुजोरा दिला आहे.

महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा केला. मात्र, महायुतीच्या या नेत्यांचा दावा नरेंद्र स्वामींनी फेटाळून लावला आहे… महायुतीला लाडक्या बहिणींमुळे नव्हे तर साधू-संत आणि संघामुळे विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे

नरेंद्र स्वामींनी केलेल्या दाव्याला भाजप नेत्यांनी देखील दुजोरा दिला आहे. साधू-संताचा महायुतीच्या विजयात हातभार असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. तसंच लाडक्या बहिणींचाही मोठा वाटा होता असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू-संतामुळे महायुतीचा विजय झाल्याचं विधान केल्यानंतर नरेंद्र स्वामी चांगलेच चर्चेत आले आहेत. तसंच नरेंद्र स्वामींनी यावेळी एकनाथ शिंदे आणि दादांना देखील टोला लगावला होता.

Leave a Comment