मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हितशत्रुंवर मात कराल.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शत्रुपीडा नाही.
मकर : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
