मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (25 फेब्रुवारी) महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीनं या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच भाजपच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे नेते राहुल कुल यांची वर्णी लागली आहे. तर पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली आहे. तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे.
विविध समित्यांचे अध्यक्ष:
सार्वजनिक उपक्रम समिती: राहुल कुल
पंचायत राज समिती: संतोष दानवे-पाटील
आश्वासन समिती: रवी राणा
अनुसूचित जाती कल्याण समिती: नारायण कुचे
अनुसूचित जमाती कल्याण समिती: राजेश पाडवी
महिला हक्क व कल्याण समिती: मोनिका राजळे
मराठी भाषा समिती: अतुल भातखळकर
विशेष हक्क समिती: राम कदम
धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती: नमिता मुंदडा
आमदार निवास व्यवस्था समिती: श्री. सचिन कल्याणशेट्टी
