प्रयागराज येथे आमदार अमोल खताळ यांचे अमृतस्नान

संगमनेर – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभमेळ्यात शिव सेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्रीगण, आमदार, शिव सेना नेते आणि शिवसेना कार्यकर्त्यां सह संगमनेरचे आ अमोल खताळ यांनी सुद्धा त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान करून धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभूती घेतली.

गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमातील स्नान हे तमाम हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचे केंद्र असून, या वेळी आ अमोल खताळ यांनी संगमनेर मधील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि विकासासाठी विशेष प्रार्थना केली.

महा कुंभमेळा हा भारताचा सर्वात भव्य,पवित्र अन धार्मिक सोहळा असून,आस्था,भक्ती आणि अध्यात्म यांचे अद्वितीय प्रतीक आहे.या पुण्य स्नानानंतर प्राप्त होत अस ल्याचे आ अमोल खताळ यांनी सांगितले यावेळी शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment