बापरे! गावच्या सरपंचाचे घृणास्पद कृत्य, नाशिकमध्ये खळबळ 

नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावच्या सरपंचानेच दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

ही घटना चांदवडच्या विटावे गावात घडली आहे. सरपंचाने मुलींच्या आजीच्या मदतीने या दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात अनुसूचित जमाती प्रतिबंधक व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.

दोन अल्पवयीन मुलींवर आरोपीने त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर व विटावे इथे शरीरसंबध केल्याचा आरोप आहे. तर संशयित आरोपीसोबत जाण्यास मुलींनी नकार दिल्याने आजीने दोघींना चावा घेत व शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन घरात कोंडून ठेवल्याची तक्रार पीडित मुलींनी दिली आहे. मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन हे स्वत: या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Comment