पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे खुर्द येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत सन 2000 ते 2001 या वर्षात शिक्षण घेतलेले विद्यार्थी तब्बल 24 वर्षांनी एकत्र आल्याचे बघायला मिळाले. मांडवे खुर्द येथे या सर्व विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत अनुभव सांगितला.
विशेषतः तब्बल 24 वर्षांनंतर मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच एकच वेगळंच वातावरण निर्माण झाले होते. तसेच सर्व शिक्षक स्टाफही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करण्यात आले. सर्वांनी जुन्या आठवणी आठवणींना उजाळा देत हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमासाठी वर्गशिक्षक डी एन मोरे सर, भडांगे सर, रोहकले सर, जाधव सर, गागरे सर, आहेर एनटी सर, अण्णासाहेब क्षिरसागर , रंगनाथ गागरे, तसेच माजी विद्यार्थी संदीप क्षीरसागर, पुंजाहरी बाचकर, योगेश शिंदे, नंदन भोर, शांताराम गागरे, बाबासाहेब गागरे, मेजर दीपक जाधव, संदीप फटांगरे, शिवाजी फटांगरे, नवनाथ औटी, रामदास फटांगरे, चेअरमन संजय भोर, नंदू बिडकर, किसन देशमुख, विनोद वाडेकर, विश्वास जाधव, दत्तात्रय साळुंखे, आशाबाईं निघुट, रोहिणी औटी, जयश्री जाधव, बबई बर्वे, सविता गागरे, सुंदर राहणे, अर्चना साळवे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्तावित संजय भोर यांनी केले तर आभार संदीप क्षीरसागर यांनी मांडले.
