संगमनेर (DSNews24/किरण पुरी ) तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्समध्ये दिनांक 11/11/2024 रोजी सकाळी 9-00 वाजता संकेत लोळगे त्यांचे कान्हा ज्वेलर्सचे दुकानावर आले असता दुपारी 01-30 वा. चे सुमारास दुकानात असताना दुकानातील गि-हाईकांना सोन्याचे दागिने दाखवित असताना अचानक दुकानात पाच अनोळखी इसम आले होते. यावेळी त्यांचे तोंड बांधुन हातात गावठी कट्टे घेवुन आले व लोळगे यांना पिस्तुल दाखवुन दम दिला की, तु खाली बस असे म्हणाल्याने ते घाबरुन काउंटरच्या खाली बसले. तसेच दुकानात आलेल्या ग्राहकास तु शांत बस असे म्हणुन त्याला देखील खाली बसविले.
दुकानाच्या काँउटरच्या आत मध्ये येवुन दुकानाच्या भिंतीला लावण्यात आलेल्या ट्रे मधील सोन्याचे दागिने व कांउटरच्या आत मध्ये चांदीचा व सोन्याचे तयार दागिने काढुन काँउटरवर काढुन त्यांचेकडील बॅगमध्ये भरले. तसेच दुकानात असलेले 52,41,600/- रु.कि.चे. सोने चांदीचे व रोख रक्कम असा माल बॅग मध्ये भरुन घेवुन दुकानाचे बाहेर जावुन दरोडेखोरांनी हावेत तीन वेळा गोळीबार केला आणि दोन पल्सर मोटार सायकल वरुन मांडवे रोडच्या दिशेने पळुन गेले. त्यावरुन घारगांव पो.स्टे. गुन्हा रजि.नं. 402/2024 भा.न्या.सं. कलम 310(2),61(2), 49 सह भा.ह.का. कलम 3(25), 7(25), 27 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
घारगांव पोलीस स्टेशन हद्दीत सोनाराच्या दुकानावर दरोडा पडल्याने श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर, श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व त्यांचा स्टाफ, व श्री. दिगंबर भदाणे, पोलीस निरीक्षक, घारगांव पोलीस स्टेशन व त्यांचा स्टाफ असे तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर, यांनी तत्काळ खास पथके तयार करुन आरोपीचां शोध घेण्यासाठी पाठविले होते. अवघ्या 12 तासातच गुन्ह्यातील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसातच गुन्ह्यातील 5 आरोपींना ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोन्याचे दागीन्यांपैकी 195.250 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली करुन व इतर मुद्देमाल हस्तगत केला असा एकुण 17,35,425/- रु. किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्यात एकुण 09 आरोपी निष्पण केले आहेत.
त्यामधील 1) अक्षय बाळासो वावरे, वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे, 2) स्वप्नील किशोर येळे, वय 22 वर्षे, माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे, 3) सुनिल उर्फ निल विजय चव्हाण वय 28 वर्षे, रा.489 गणेशपेठ पुणे 4) मनोज उर्फ दयावान बाळु उर्फ बाळासाहेब साठे वय 25 वर्षे, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापुर, 5) अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळु देवकर वय 22 वर्षे, रा. कौठेयमाई, ता. शिरुर, जि. पुणे, 6) योगेश अंकुश कडाळे वय 27 वर्षे, रा. धामणी, लोणी, ता. आंबेगांव, जि. पुणे, 7) आकाश ठकाराम दंडवते वय 28 वर्षे, रा. मलठण, ता. शिरुर, जि. पुणे असे आरोपी अटक केले आहेत. तसेच 8) धोंडीभाऊ उर्फ धोंड्या महादु जाधव, रा. निघोज, ता. पारनेर, हल्ली रा. मंचर, जि. पुणे (फरार) 9) सुरजसिंग उर्फ मन्ना उर्फ अजयसिंग रा. हारदो चक बांम्बा, मंदिर म्हाश्रा भागी, तर्न तरन पंजाब (फरार) असे दोन आरोपी फरार आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्री. दत्तात्रय कराळे सो. पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर, यांनी गुन्ह्यातील आरोपीतांची सराईत आरोपी असल्याने त्या आरोपीवर प्रभावी प्रतिबंध करवाई होण्यासाठी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत 1999 चे कलम 3(1) (II), 3(2), 3(4) अन्वये प्रस्तावर तयार करणे बाबत आदेशीत केले होते. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी गुन्ह्यातील आरोपीवर दाखल गुन्ह्याची माहिती प्राप्त केली असता गुन्ह्यातील 09 आरोपी यांचे विरुध्द गंभीर स्वरुपाचे एकुण 21 गुन्हे दाखल असल्याने सर्व माहिती प्राप्त करुन श्री. दत्तात्रय कराळे सो. पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना सादर केला असता सदर गुन्ह्यात दि. 06/02/2025 रोजी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत 1999 चे कलम 3(1) (II), 3(2), 3(4) अन्वये कलम वाढ करण्याचे आदेश केल्याने गुन्ह्यात कलम वाढ करुन गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करण्यासाठी डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर दिला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास श्री. दत्तात्रय कराळे सो. पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर यांचे पथक सहा. पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोकॉ सुरेश शेळखे, पोकॉ सुभाष बोडखे, पोकॉ प्रमोद गाडेकर, नेम घारगांव पोलीस स्टेशन, पोहेकों राहुल डोके, पोकों राहुल सारबंदे, मपोकों ताई शिंदे, नेम. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर असे करत आहेत.
