मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
वृश्चिक : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
