BREKING! एसटी बसचा भीषण अपघात, महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू

Bus Accident: नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या आसरखेडाजवळ एका एसटी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात बसची महिला कंडक्टर सारिका लहरे व एक महिला प्रवासी संगीता खैरनार या ठार झाल्या आहे. तसेच २० ते २२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

समोरून आलेल्या एका वाहनानं दिलेल्या जबर धडकेमुळं एसटी बसचा चक्काचूर झाला आहे. एसटी बस नांदूरगड येथून मनमाडच्या दिशेनं जात होती, त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मनमाड डेपोतील एसटी बस नांदूरगड येथून मनमाडच्या दिशेनं येत असताना आसरखेडाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव वाहनानं एसटीला जोराची धडक दिली. भीषण अपघातात महिला कंडक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

बसमध्ये किमान ३० ते ३५ प्रवासी होते, त्यातील २० ते २२ प्रवाशांना गंभीर मार लागल्याची माहिती आहे. त्यानंतर आता जखमींना उपराचासाठी तातडीनं चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Leave a Comment