राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतात दुसरा मोठा झटका बसला आहे.
केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांच्या मुलानंतर आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी(Kirankumar Reddy) यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अलीकडेच किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित राजीनामा दिला होता.
त्यानंतर आज रेड्डींनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
