सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बडा नेता कॉंग्रेसमधून निलंबित

नागपूर : पक्षविरोधी विधाने केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख(Ashish Deshmukh) यांना निलंबित करण्यात आलेय. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुखांना कारणेदाखवा नोटीस बजावत 3 दिवसात उत्तर दाखल करण्याची सूचना केलीय.

नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळावरुन आशिष देशमुखांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.

त्यानंतर नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाकडं देशमुख यांची तक्रारही केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशमुख यांनी राहुल गांधींना ओबीसी समाजाची माफी मागावी अशी सूचना केली होती.

देशमुखांच्या या विधानांची काँग्रेसनं दखल घेतली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु केली होती. पक्षातील नेत्यांविरोधात वारंवार विधान केल्याप्रकरणी आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे.

देशमुखांना सध्या पक्षातून निलंबित करण्यात आले असून जर त्यांनी या कालावधीत समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यांची पक्षातून कायमची हाकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment