आजचे राशिभविष्य काय आहे, वाचा…

मेष – जीवनसाथीची प्रगती होईल. तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. उत्साह देणारी बातमी कळेल.

वृषभ – विरोध होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हिशोब नीट करा.

मिथुन – नवीन विचारवंतांचा सहवास मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पुरस्कार मिळेल.

कर्क – थोड्याच दिवसात तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. तुम्ही निरीक्षण करा. संयम ठेवा.

सिंह – आप्तेष्ठांचा सहवास मिळेल. प्रेरणादाई घटना घडेल. धंद्यात फायदा होईल. कायद्यात यश मिळेल.

कन्या – व्यवसायात फायदा झाल्याने मोठी गुंतवणूक करता येईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. तुम्हाला पद देण्याचा निर्णय होऊ शकतो. प्रभाव वाढेल.

वृश्चिक – मनावर दडपण येईल. तुमचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ रहा.

धनु – विचारांना चालना मिळेल. लिखाणाला नवा विषय मिळेल. चांगले मित्र मिळतील.

मकर – तुम्हाला चालू परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. दिवस आनंदात जाईल.

कुंभ – तणाव कमी होईल. नवा परिचय झाल्याने धंद्यात चांगली वाढ करता येईल. पद मिळेल.

मीन – आर्थिक लाभ होईल. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. मुलाला जपा.

Leave a Comment