दौंड तालुक्यातील मळद येथे शनिवारी ( ता. ८ ) सकाळी सहाच्या सुमारास पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी खाजगी आराम बस खड्डयात उलटल्याने प्राथमिक माहितीनुसार पुणे शहरातील एक महिला भाविक ठार झाली असून दोन ते तीन अत्यावस्थ असन तीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यामध्ये वृध्द महिला पुरूष व लहान मुलांचा समावेश आहे.
पुणे शहरातील भवानीपेठ, लोहियानगर परिसरातील ५५ ते ६० भाविक खाजगी आराम बसमधून ( एमएच.१२, एफसी. ९०५५ ) तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनाला गेले होते.
देवदर्शन करून पुण्याकडे परत असताना दौंड तालुक्यातील मळद हद्दीतील घागरेवस्तीजवळ शनिवारी ( ता.८ ) सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्यामधील पावसाचे पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या मोरीमध्ये उलटली.
या अपघात बसमध्ये प्रवाशी अंगावर पडून खाली सापडल्याने एक महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचा व आणखी पंचवीस ते तीस भाविक जखमी झाले असून त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचा प्राथमिक अंदाज मदतकार्य करणार्या स्थानिक तरूणांनी व्यक्त केला. जखमींना उपचारासाठी दौंड व भिगवण ( ता. इंदापूर ) येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
