संगमनेर : पठारभागातील ‘या’ विद्यालयात घडला धक्कादायक प्रकार, एकच खळबळ

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घारगांव या महाविद्यालयातील कार्यालयाची जाळपोळ व सामानाची नुकसान झाल्याची घटना गुरुवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घारगांव येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत भारत हायस्कूल हे कनिष्ठ महाविद्यालय आहे. नेहमीप्रमाणे शिक्षक गुरवारी सकाळी महाविद्यालयात आले तर मेन गेटजवळ जाताच त्यांना समोर असलेल्या कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसला.

कार्यालयातून आगीचे लोट बाहेर आल्याच्या खुणा दिसल्या त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकांनी गेट न उघडताच घारगांव पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलावले व गेट खोलून आतमध्ये जाऊन पाहिले असता कुणीतरी अज्ञाताने विद्यालयात पाठीमागील बाजूस चढून प्रवेश केला होता. व विद्यालयातील कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व कार्यालयातील केबीनला आग लावल्याने कार्यालयातील कॉम्पुटर, प्रिंटर आदि साहित्य जळून खाक झाले होते.

तसेच प्रयोगशाळा उघडून त्यातील सामानाचे तसेच इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान केल्याचे आढळून आले. तर विद्यालयातील फळ्यांवर अश्लिल भाषेत मजकूर लिहील्याचे दिसून आले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी याच विद्यालयातील बोअरवेल ची मोटारीची देखील चोरी झाली होती . ज्या ठिकाणी विद्यादान करून भावी आदर्श पिढी निर्माण करण्याचे काम केले जाते. अश्याच शाळा महाविद्यालयांमध्ये विकृत व्यक्तींकडून असे कृत्य घडत आहे.तर अनेक टार्गेट विद्यालय भरताना किंवा सुटताना दुचाकीवरुन फिरत असतात.

तसेच विद्यालयातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात अश्यांनाही कायमचा लगाम लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने त्या व्यक्तींना शोधून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Comment