बिग ब्रेकिंग! ….तर अजित पवारांना मुख्यमंत्री करू, ‘या’ नेत्याची खुली ऑफर

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांच्यासंदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपात जाणार, असा दावा केल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे आणि त्यातच आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, “अजित पवार भाजपात जातील असं मला वाटत आहे. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी शपथदेखील घेतली होती.

मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यासोबतच आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती संधी आम्ही अजित पवारांना देऊ.” आठवलेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Leave a Comment