मुंबई – राजकरणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केले.
यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मात्र मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे लवकरच महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल’, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
