पठार भागात खळबळ, गुप्ती घेऊन फिरणाऱ्यास अटक

घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे गुप्ती हातात घेऊन मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्यास घारगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.११) दुपारी चार वाजताच्या सुमारास अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार नारायण ढोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष लालू कहाणे (रा. आंबी खालसा, ता.संगमनेर) याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आंबी खालसा फाटा येथे हॉटेल लक्ष्मी समोर संतोष कहाणे हा मोठ्याने आरडाओरडा करून हातात गुप्ती घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत गुप्ती जप्त केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी.एस.मरभळ हे करीत आहेत.

Leave a Comment