नगर – नवी पेठ येथील श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्सवानिमित्त सकाळी महाअभिषेक . करण्यात आले. यावेळी हनुमान चालीसा पठण श्रीराम जय राम जयजय राम नाम जप आणि भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
श्रीराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आले. भावीक भक्तांना श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट वतीने महाप्रसादाचे आयोजन बडी साजन मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या महाप्रसादाचा असंख्य भावीक भक्तांनी लाभ घेतला. महाप्रसाद उत्कृष्ठ चुरमा दाळ बाटी चा महाप्रसाद ५००० भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला
हनुमान जन्मोत्सव मंदिरात पहाटे पासूनच भावीक भक्तांचे मोठे गर्दी होती. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मंदिरात येऊन प्रभू श्रीराम आणि बजरंग बली यांचे दर्शन घेऊन बोल बजरंग बली की जय …. पवनपुत्र हनुमान की जय… जय श्रीराम….. घोषणा देत आनंद व्यक्त करत होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने भक्तांना टरबूज व खरबूज लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आले.
श्रीराम मंदिरामध्ये ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव . हनुमान जन्मोत्सव. गोकुळ अष्टमी अन्नकुट महोत्सव देवदिवाळी असे सर्व उत्सव व महाप्रसाद वाटप करण्यात येते.तसेच दर शनिवारी रात्री ८ ते १० या वेळेत हनुमान चालीसा व भजन संध्या कार्यक्रम व महाप्रसाद वितरण करण्यात येते.
भजन कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि बजरंग बली यांचे अनेक भजने गाण्यात आले. या भजनात भाविक दंग होऊन प्रभु श्रीरामाचा आणि बजरंग बली चा जय घोष करत होते. अत्यंत सुरेख नियोजनामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
होळी पौर्णिमा ते हनुमान जन्मोउत्सव सोहळा हा 31 दिवसीय सामुहिक महा हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या व श्रीराम जय राम जयजय राम (नाम जप ) कार्यक्रम संपूर्ण शहरात दररोज विवीध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला या साठी सर्व शहरवासीयांनी भक्तीमय वातावरण निर्माण करून उदंड भरभरून प्रतिसाद दिला. या सर्व कार्यक्रमासाठी श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष प्रीतम मुथा, उपाध्यक्ष निखिल शेटीया यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व सर्व सेवेकरीनी विशेष परिश्रम घेतले. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट च्या वतीने उदंड प्रतिसाद मिळाला त्या बद्दल सर्व शहरवासियांचे आभार मानण्यात आले.
