संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील पठार भागातील युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे युवकांचा आधारवड, गोरगरिबांचा कैवारी, वेळेला धावून जाणारे गुलाबराजे भोसले यांची भाजप तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी साकूर येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गुलाबराजे भोसले यांनी जाहीर प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुलाबराजे भोसले यांनी पायाला भिंगरी लावून पठार भाग पिंजून काढला होता. तसेच विविध सामाजिक कामांसाठी धावून गेले आहे. गुलाबराजेंनी हाच विश्वास सार्थ ठरवत भाजपने मोठी जबाबदारी त्यांच्यावर मोठी सोपवली आहे.
या निवडीबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांनी गुलाबराजे भोसले यांचं अभिनंदन केले आहे…
