संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गौतम महादू मिसाळ हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ व जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन वार – बुधवार दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले आहे.
सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे असणार आहे.
तसेच यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी चेअरमन बाजीराव पा खेमनर, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पा खेमनर, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, स म भा सं थोरात कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत पा खेमनर, प्रा रामदास पाटील धुळगंड, स.ब.वि. प्र. समाजचे सेक्रेटरी मा प्रधान जिल्हा न्यायाधिश सुमंत कोल्हे साहेब, संचालक श्री सिताराम पाटील धुळगंड, सह सेक्रेटरी श्री बी.आर. गवांदे सर, मांडवे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन श्री रूपेश धुळगंड, केंद्रप्रमुख श्री विनायक भोसले सर, मांडवे बुद्रुक च्या सरपंच श्रीम आशा कुटे, हिवरगाव पठारच्या सरपंच कु सुप्रिया मिसाळ या मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मुळाखोरे मा विद्यालय मांडवे बु शाळाव्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि वीरभद्र विद्यालय साकूर स्टाफ तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे
