बुलढाणा (DSNews24 /ॲड. स्वाती बारभाई) महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखलं जाणाऱ्या श्री जगदंबा देवस्थानच्या आई भवानीची भव्य मिरवणूक देऊळगाव राजा येथे काढण्यात आली. विशेषतः या मिरवणुकीत प्राध्यापक मुकुंद आंधळे सर यांनी आई भवानीच हुबेहूब रूप सादर केले होते. यावेळी त्यांनी भाविकांना आशिर्वाद दिला. मात्र साक्षात आई भवनीच प्रकट झाल्याच बघायला मिळाले.
या मिरवणुकीसाठी महाराष्ट्रासह परराज्यातील असंख्य भाविक भक्त जातीने उपस्थित राहिले होते. त्यामुळे भक्तीसागराचा अथांग महासागर ओसंडून वाहत होता. सालाबाद प्रमाणे यावर्षीची आई भवानीचे मिरवणूक ही अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाली. यावेळी ढोल, ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. अत्यंत प्रसन्न वातावरण आई भवानीच्या पदस्पर्शाने निर्माण झाले होते.
मात्र सप्तशृंगी मातेचे संपूर्ण हुबेहुब रूप उठवले गेले पाहताक्षणी साक्षात श्री.सप्तशृंगी माता अवतरल्या असा प्रत्यय यावेळी येत होता. यावेळी मातेने नगर प्रदक्षिणा देखील घातली. त्यामुळे खरोखरच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
